Skip to content
Spiritual Journey

Spiritual Journey

From nowhere to know where

Primary Menu
  • Home
  • Quotes
  • Articles
    • Aurobindo Philosophy
    • Yog
    • Religion and Culture
    • Life of Immigrant
    • Vyaktirekha
  • Audio & Video
  • Resources
  • Home
  • Aurobindo
  • श्री अरविंदांचा पूर्णयोग
  • Aurobindo

श्री अरविंदांचा पूर्णयोग

Narendra Nadkarni March 9, 2023

सध्याच्या काळात योग शब्दाचे अनेक अर्थ लावले जातात .

  • सर्वसामान्य लोक योग म्हणजे शरीर व मन यांना स्वास्थ्य मिळवून द्यायचे एक साधन  मानतात .
  • योग म्हणजे प्राणायाम वगैरे करून कुंडलींनीशक्ती जागृत करण्याची प्रक्रिया  असे काही लोक मानतात 
  • काही लोक  असे मानतात की माया–मोह–दु:ख यांनी भरलेल्या संसारातून ध्यानाच्या  विशेष प्रक्रियेदवारा मुक्ति प्राप्त करून घेण्यासाठी राजयोगी  व  ज्ञानयोगी जो मार्ग स्वीकारतात तो योग .
  • काही लोक असे मानतात  की   भगवंताला प्रसन्न करून इच्छित वर प्राप्त करून  दिव्य आनंदलोकात  स्थान प्राप्त  करण्यासाठी  भक्तीचा जो   मार्ग चोखाळला जातो तो योग .
  • काही लोक असे मानतात  की गीतेने  विशद  केल्याप्रमाणे  संसारात  राहून कर्म  करून  आंतरिक दृष्टीने जीवन्मुक्तीची  अवस्था प्राप्त  करणे  हाही  एक प्रकारचा योग होय 

*********** श्री अरविंदांच्या  दृष्टीकोनातून  वैयक्तिक,  सांसारिक,  किंवा  पारलौकिक सुखाची प्राप्ती हा पूर्णयोगाचा उद्देश नाही,

अथवा मोक्ष  किंवा  मुक्ति हा सुद्धा उद्देश नाही .——–  तर

आपल्या  अंतरंगात असणार्‍या  आणि   सुप्त   असलेल्या अशा दिव्य संभावनांचा विकास ( Integral Development )  हा  योगाचा खरा अर्थ आणि उद्देश होय. मानवी जीवनाच्या  अंध:कारापासून  पलायन  करणे  म्हणजे योग नव्हे तर त्याच अंध:कारात दिव्य  प्रकाश  उतरवण्याच्या क्रियेला पूर्णयोग म्हणतात. **********************

*   मुळात योग म्हणजे जुळणे किवा जोडणे . श्री अरविंदांच्या पूर्णयोगाचा  अर्थ आहे ——- मनुष्याच्या

        प्रकृतीच्या सर्व रूपात आणि सर्व स्तरांवर भगवंताशी जुळणे , जोडले जाणे आणि पुन: भगवंताच्या

    चितशक्तिशी जोडले जाऊन त्या शक्तीच्या कृपेने प्रत्येक भागात दिव्य पूर्णता  प्राप्त करणे.

  •    सर्वसामान्यपणे प्रत्येक योगमार्गात प्रकृतीचा एखादा भाग अथवा प्रवृत्ती  घेऊन प्रकृतीच्या पलीकडे

   जाण्याचे  एक द्वार म्हणून त्याचा  उपयोग केला जातो  —–   जसे —-

     # ज्ञानयोगी  — मन अथवा ज्ञानजिज्ञासा यांचेद्वारे

     # भक्तीयोगी  — भावना व संवेदना यांचेद्वारे

     # कर्मयोगी – कर्म आणि संकल्पशक्ति यांचेद्वारे

     # हठयोगी —  शरीर आणि प्राणशक्ती यांचेद्वारे

     # राजयोगी – मन आणि प्राणशक्ती यांचेवर संयम साधून

                  ———– जन्ममरणाच्या फेर्‍यातुन मुक्त होण्याचा प्रयत्न करतात .

      ********* श्री अरविंदाच्या पूर्णयोगात मन ,हृदय, प्राण तसेच शरीराच्या सर्व गतीवृत्ती भगवंताकडे

      वळवल्या जातात . पण हे सर्व   मोक्ष, विलय, अथवा व्यक्तीगत प्राप्तीसाठी नव्हे तर सर्व जीवनात

      भगवंताचे नियमन लागू करण्यासाठी . —————-

      # अहंकाराच्या जागी भगवंताची प्रतिष्ठापना करणे म्हणजे योग .

      # काम-वासनांच्या ऐवजी भगवंताच्या शुद्ध शक्तीची लीला प्रस्थापित  करणे म्हणजे योग.

      # मर्यादित आणि मोहग्रस्त मानवी प्रेमाच्या जागी दिव्य प्रेम आणणे  आणि आनंदाचा वर्षाव

        घडवून आणणे म्हणजे योग .

      # मानवी मनाच्या धारणा आणि समजुती याऐवजी दिव्य ज्ञान आणि

        प्रकाश उतरविणे म्हणजे योग .

      # सामान्य मानवी जीवनातील क्षुद्र व्यक्तीगत इच्छांची  पूर्ती करण्याऐवजी  भगवत संकल्पाच्या

        पूर्तीसाठी जीवन जगणे म्हणजे योग .

      # हाच  दिव्ययोग  पुढे विकसित झाल्यावर  पृथ्वीतलावर  निर्माण  होणार्‍या  नवीन दिव्य

        समाजाची आणि  दिव्य जगताची  स्थापना करण्यात सहभागी होणे म्हणजे पूर्णयोग करणे.

       # To  enter  into  relations with  GOD  is  yoga

                                                 “ संजीवन “ मासिकाच्या आधारे .  

====================  *************** ==================== 

Shri  Aurobindo   says  —     Yoga   has   4   powers   and   objects  .

1)  Purity    2)   Liberty    3)  Beatitude   4 )   Perfection .

Sri   Aurobindo  says  —   By  yoga  we  can  rise ————

  •  Out  of  Falsehood    ——-  Into  Truth .
  •  Out  of  Weakness    ——-  Into  Strength .
  •  Out  of  Pain & Grief   —-  Into  Bliss .
  •  Out  of   Bondage     ——-  Into  Freedom .
  • Out  of  Darkness     ——–  Into  Light .
  • Out  of  Self-Division  ——  Into   Unity .
  • Out  of  Imperfection   ——  Into  Perfection .
  • Out  of   Death    — ———  Into   Immortality .                                             

Continue Reading

Previous: The Mother
Next: पूर्व आणि पश्चिम

Related Stories

  • Aurobindo

जीवन साफल्य – सौंदर्याची तपस्या

Narendra Nadkarni March 18, 2023
  • Aurobindo

प्राणिक सामर्थ्याची तपस्या

Narendra Nadkarni March 18, 2023
  • Aurobindo

  दैवी प्रेमाची तपस्या

Narendra Nadkarni March 18, 2023
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.