` आज दसरा , विजया दशमी आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार २५ ऑक्टोबर . ही तिथी आणि हीच तारीख बरोबर ४६ वर्षापूर्वी एकत्रित होत्या . २५ ऑक्टोबर १९७४ रोजी पप्पानी या जगाचा निरोप घेतला त्याला आता ४६ वर्षे झाली . तो दिवस आजही चांगलाच स्मरणात आहे अनिल दळवीचा त्या दिवशी विवाह होता. पप्पांच्या आजारपणामुळे सकाळी मुहूर्तास भांनुताई व नंदुभाऊ यांनी जायचं आणि मी व लता संध्याकाळी अशी व्यवस्था झाली होती . अचानक पप्पांची प्रकृती बिघडली , डॉक्टर येईपर्यंत पप्पानी शांतपणे निरोप घेतला होता . सर्वांचं जाणं रहित झालं . कोणाही नातेवाईकांना कळवले नाही कारण सगळे विवाह समारंभास गेले होते .
पप्पांच्या निधनाची वार्ता वार्याबरोबर सार्या ठाणे शहरात पसरली . दसर्याचा दिवस असूनही जवळ जवळ ३०० ते ४०० लोक अंत्ययात्रेस हजर होते . कॉंग्रेस पक्षाच्या वतीने वाजपेयी काकानी भाषण केल्याचे मला आठवते .
पप्पानी त्यांच्या मृत्यूपूर्वी कधीतरी आपल्या मृत्यूपत्राचं एक कच्च लिखाण करून ठेवलं होतं . वस्तूत: पपांच्या त्यागमय जीवनाच्या अखेरीस त्यांच्याकडे पैसा अडका , जमीन जुमला , वगैरे काहीही नव्हतं . पण पपांच्या शब्दात मृत्यूपत्र म्हणजे अखेरची इच्छा व्यक्त करणारा दस्तऐवज . पपानी त्यांच्या या मृत्यूपत्रात असे स्पष्टपणे म्हंटले होते की मृत्यूनंतर त्यांना कोणत्याही पद्धतीने सन्मानित केले जाऊ नये . ( I want to die as a commonest amongst the commons .) पपानी हे मृत्यूपत्राचं लिखाण कोणालाही दाखवलं नव्हतं . त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेविरुद्ध स्मशानात त्यांचा गौरव करणारी भाषणं झाली . सर्वत्र दुखवट्याचे ठराव पास झाले आणि वर्तमानपत्रातही त्यांच्या त्यागाचा उल्लेख करून बातमी छापून आली . मृत्यूपत्रात व्यक्त करण्यात आलेल्या इच्छेची अंमलबाजावणी करण्याची जबाबदारी मुलगा म्हणून पपांनी माझ्यावर सोपवली होती . पण सर्व घटना त्यांच्या इच्छेविरुद्ध घडल्या . मुळात हे मृत्यूपत्र मला सापडलं ते पपा गेल्यानंतर जवळ जवळ ३ महिन्यांनी . त्यामुळे जरी माझा दोष नव्हता तरीही त्यांची इच्छा राखली न गेल्याचं शल्य मला टोचत होतं . आणि म्हणून हे मृत्यूपत्र तरी आता प्रसिद्ध करावं की करू नये अशा द्विधा मनस्थितीत सांपडून मी ते मृत्यूपत्र तसंच माझ्याकडे जपून ठेवलं .
मृत्यूपत्र प्रसिद्ध न करण्याचं आणखीही एक महत्वाचं कारण होतं . स्वातंत्र्य मिळून २५ वर्षाहून अधिक काळ लोटला होता . स्वातंत्र्यापूर्वीची पिढी जशी हळू हळू काळाच्या उदरात नाहीशी होत होती तसतशी त्या पिढीने जपलेली जीवन-मूल्यंही धूसर होऊ लागली होती . स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पिढीसमोर कोणताही उदात्त आदर्श नव्हता . सार्वजनिक जीवनातही स्वार्थपरायणतेतून पैसा , प्रसिद्धी आणि सत्ता प्राप्त करणं याला महत्व प्राप्त झालेलं होतं . अशा या सामाजिक वातावरणात पपांसारख्याच्या वागण्याचं , विचारांचं कौतुक कुणाला होतं ?
पपांचं हे मृत्यूपत्र मी एक कौटुंबिक ठेवा म्हणून बरीच वर्षे सांभाळून ठेवले . पण १९९१ साली श्रीरंग सहनिवासाच्या परिसरात आलेल्या महापुरात आमच्या घरात पाण्याची पातळी ५ फुटापर्यंत चढली व अनेक दुर्मिळ पुस्तकं , कॅसेट्स , आल्बम्स तसेच इतरही अनेक मौल्यवान वस्तु या पुरात नष्ट झाल्या . दुर्दैवाने पपांचं हे मृत्यूपत्रही त्या पुरात नष्ट झालं . शेवटी हीही परमेश्वराची इच्छा . त्यांचे विचार आता त्यांच्या अक्षरात , त्यांच्या शब्दात कोणालाही कळू शकणार नव्हते . आणि म्हणून मला त्यातील मुख्य भाग जसा आठवत होता तसा माझ्या शब्दात लिहिण्याचा मी प्रयत्न केला तो त्यांचे हे विचार मुख्यत: आमच्या पुढील पिढीपर्यंत तरी पोहोचावे म्हणून .
——- पपांचे अखेरचे इच्छापत्र – ( माझ्या शब्दात ) ——-
” Many eyebrows are likely to go up when it will be known that I am writing my ” Will “. This is because there is a common belief that ” Will ” is to be written or made only to distribute or allocate the personal property , movable &/or immovable , amongst the heirs . And it is also probably known by one and all that I do not hold any such property or any Bank balance or any Insurance Policy . Let me , therefore , explain in the first instance that ” Will ” is nothing but a last wish , what the person desires to be done after his death .
I therefore solemnly declare that my only last wish is ” I want to die as a commonest amongst the commons , that no one should make any speach in the crematory lauding the sacrifice , I did in the Freedom Struggle , that no condolance meeting should be held and that no news should be given in the Newspapers . ”
I appoint my son Narendra as the executor of my will and I request everyone to give due co-operation to him in executing the ‘ Will ‘ .
Now obviously anyone would ask why I have expressed such a desire . The reason is , in the freedom struggle hundreds and thousands of people sacrificed whatever they had for the cause of the Nation . Thousands of people did the Supreme Sacrifice by laying their lives and all these people died unsung and unwept . Today no one remembers their sacrifice . I feel , therefore , that I have no right to get my sacrifice glorified after my death .
I give below two instances which made me really unhappy about the behavior of my party people .
1) At the time of 1952 Elections , while offering Thane constituency Assembly seat to Madhavrao Hegde , the State leadership had promised him that he would be made a minister after the election . Madhavrao had resigned from the Government Pleadership on this offer and the promise before contesting the election . We all felt deeply hurt when the party leadership did not keep the promise .
2) Sitaram Birje was a Congress volunteer who had taken part in the struggle and who was also imprisoned . Since he had no one to help him in the world , he preferred to stay with me , after the struggle , and offered to do the household work . Personally I considered him as a member of my family and we all never treated him as a servant . All the congressmen knew him very well. But no one enquired about him when he was on the deathbed . Sitaram was also a freedom fighter but no one took any cognisance when he died . ”
============ $$$$$$$$$$ =============