
मला लहानपणा पासून हा प्रश्न पडत आला, कि हे सगळे स्वामी /गुरु लोक म्हणजे रामदास स्वामी, ज्ञानेश्वर महाराज, योगी अरविंद विवेकानंद, रमण महर्षी ईत्यादी म्हणजे हे सगळे गुरूतुल्य किंवा गुरूच म्हणाना ह्यांना संसाराचा अनूभव काय? आणि जर ह्यांनी संसाराचं केला नाही तर हे त्या विषयावर उपदेश कसा करू शकतील?
असाच विचार करत असताना माझ्या लक्षात आले कि हल्ली सगळे Parenting , marriage, career वर उपदेश करत असतात तसा ह्या गुरूंनी केलेला नाही.
हल्लीच्या संसारी लोकान मध्ये नोकरी मुलं, कुटूंब ह्या बद्दलचेच प्रश्न जास्त दिसतात आणि त्या मुळे माझ्या डोक्यात संसार (लाग्न मुला आईवडील, कामधंदा) ह्या पलिकडे काही विचार आले नाहीत..
म्हणून ही गुरु मंडळी ह्या विषयावर नेमकं कायच सांगणार, असा माझा उत्तुंग अज्ञानी अहंकार होता. त्यात रामदास स्वामी शुभं मंगल सावधान’ ऐकल्यावर स्वतःच्या लग्न मंडपातून पळून गेले आणि योगी अरविंद सुद्धा लग्न झाल्या झाल्या काही दिवसातच घर आणि बायकोला सोडून निघून गेले !
तर ही मंडळी संसारी लोकाना काय आणि कसा उपदेश करतील? फार फार तर हि सगळी मंडळी संन्यासाचा किंवा योगाचा सन्मार्ग सांगू शकतील. बरं माझ्या अत्यल्प वाचन मुळे मला Mother, कलावती आई आणि उमानंद सोडून कोणीही स्त्रिया योगी, स्वामी किंवा गुरु माहीत नाहीत.
हो. तुमच्या मनात अनेक संत स्त्रीया आल्या असतील पण मी संतां बद्दल किंवा भक्तां बद्दलचे विचार मांडत नाहीये.
तर जेव्हा वेळ आली, होय वेळच यावी लागते. जेव्हा वेळ आली तेव्हा ज्ञानेश्वरी, दासबोध वाचला आणि असे लक्षात आले कि संसार म्हणजे काय ते आधी कळायला हवे .
ही संबंध चराचर श्रुष्टि आणि त्यात होगा-या घडामोडी म्हणजे संसर … आणि तो करायाचा नसतो तर त्याचा फक्त अनुभव घायचा असतो.
बाराव्या वर्षी जे लग्नातून पळाले, ते रामदास स्वामी झाले. , रामदास स्वामी लग्नातून पळाले नाहीत तर बंधनां पासून पळाले . तो मुलगा लग्नाचा कंटाळा आला म्हणून पळाला का? कि त्याने फक्त लग्नचं केला नाही आणि बाकी सगळा संसार केला! एखादी गोष्टी करण्याची किव्वा ती नकारण्याची त्यांना जेवढी clarity होती, तेवढी आपल्याला आहे का?
रामदास स्वामीच नाही तर असे एकें लोक आहेत. जे वेगवेगळ्या वयात घरातू पळून जातात . They go after their calling. आणि असेही अनेक आहे जे काहीही झाले तरी कुठे हि न जाता त्यांच्या कुटुंबा साठीच उभे राहता. प्रत्येक व्यक्तीला माहित असत आणि हो माहित असतेच कि त्याला आतून काय करायला पाहीजे. ती Clarity जितकी, तितका निर्धार पक्का.
Bollywood films industry मध्ये तर अश्या गोष्टी किती ऐकायला मिळतात. त्या calling ची आपण ओळखच होऊ देत नाही. Even before we find that calling we start putting the layers and layers for reasoning , cause/effect, theories. Etc.
मुद्धा हा कि एक सोडून दुसऱ्याच्या मागे पळा हा नाहीये तर आपलं Calling काय आहे ते observe करा हे आहे, आणि ते सापडे पर्यंत जे कर्म आणि कार्य समोर आहे ते परमेश्वराने आपल्याला दिलं आहे ते न कंटाळता, न कटकट करता नित्य नेमाने करत रहा.
हि सगळी मंडळी संसाराचा कंटाळा आला म्हणून पळून गेली नाहीत, तर त्यांच्या आत असलेल्या call ची हाक त्याच्या ऐकू येत होती म्हणून त्या हाके मागे ते गेले. आणि त्या बद्दल भोगावे लागणारे कष्ट, अवहेलना, ताप सगळ्याला तोंड दिले आणि मुख्य म्हणजे त्यांना मिळालेल्या ज्ञानाची आणि अनुभवाची नोंद करून त्याचे रूपांतर ग्रंथा मध्ये केले.
ह्या बद्दल मी त्या सर्व मंडळींची अत्यंत आभारी आहे.
